IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीत सॅम कॉन्स्टासनं केला खास विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज…

IND vs AUS 4th Test (Sam Konstas) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नॅथन मॅकस्विनीच्या जागी सलामीचा फलंदाज म्हणून सॅम कॉन्स्टासचा समावेश केला आहे. त्याने उस्मान ख्वाजाच्या साथीने डावाची सलामी दिली आणि पदार्पणाच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत इतिहास रचला आहे.
सॅमने केला ‘हा’ खास विक्रम…
सामन्याच्या सुरुवातीपासूनच सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत होता. हा त्याचा पदार्पणाचा सामना असून पहिल्याच सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी केली. सॅमनेही पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय या युवा खेळाडूने टीम इंडियाचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्धही अप्रतिम शॉट्स मारले.
Sam Konstas becomes only second batter after Jos Buttler to hit Jasprit Bumrah for two sixes in Tests.
He also got his fifty on debut! #AUSvIND pic.twitter.com/nAQsV1I7i0
— Cricket.com (@weRcricket) December 26, 2024
यादरम्यान त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर दोन उत्तुंग षटकार लगावले. यासह कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात बुमराहविरुद्ध 2 षटकार मारणारा सॅम कॉन्स्टास हा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, 2018 साली इंग्लंडच्या जोस बटलरने ही कामगिरी केली होती.
सॅमने केली 60 धावांची खेळी..
या सामन्यात सॅमने पहिल्याच चेंडूपासून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. सॅमने वेगवान गोलंदाजांविरुद्ध अनेक अप्रतिम फटके मारले. मात्र, फिरकीच्या विरोधात त्याला थोडा त्रास झाला. पहिल्या दिवशी 65 चेंडूत 60 धावा करून सॅम बाद झाला. या खेळीत सॅमने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. रवींद्र जडेजाने सॅमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.





