IND vs AUS 4th Test : सॅम कॉन्स्टासला धक्का मारणं विराटला पडलं महागात, आयसीसीने दंडासह केली मोठी कारवाई…

IND vs AUS 4th Test (Virat Kohli vs Sam Konstas) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला गुरुवारपासून मेलबर्नमध्ये सुरुवात झाली. उभय संघांमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ही चौथी कसोटी आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुढील दोन कसोटी महत्त्वाच्या आहेत. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
चौथ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात विराट कोहली (Virat Kohli) सॅम कॉन्स्टन्सला (Sam Konstas) जाऊन धडकला आणि मैदानावर दोघांमध्ये वाद-विवाद झाला. त्यामुळे पंचांना हस्तक्षेप करायला पुढे यावे लागले. आता आयसीसीने कोहलीला कॉन्स्टास याला धक्का मारल्याबदल त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.
The ICC has confirmed the sanction for Virat Kohli.#AUSvIND | #WTC25https://t.co/tfbmHJRzTi
— ICC (@ICC) December 26, 2024
विराट कोहलीने ICC नियमांच्या अनुच्छेद 2.12 चे उल्लंघन केले आहे, ज्या अंतर्गत चुकीच्या पद्धतीने कोणत्याही खेळाडूला किंवा अम्पायरला धक्का देणे क्रिकेटमध्ये प्रतिबंधित आहे. जर एखादा खेळाडू मुद्दाम विरोधी खेळाडूच्या दिशेने चालत गेला किंवा कोणत्याही खेळाडूला किंवा अंपायरला चुकीच्या पद्धतीने धक्का दिला तर तो शिक्षेस जबाबदार असतो.
मैदानात नेमकं काय झाले…?
Elon musk change like button for #ViratKohli 🔥 Tap to See ❤️🔥🔥💥🚨
– 1 Demerit Point.
– 20% of match fees.For Virat Kohli in the incident with Sam Konstas.#INDvsAUS#Christmas #MerryChristmas#INDvAUS #ViratKohli𓃵 pic.twitter.com/zDq71ke49O
— it’s cinema (@its_cinema__) December 26, 2024
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 10व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. कॉन्स्टने चेंडूचा बचाव केला, त्यानंतर कोहली चेंडू उचलून ऑस्ट्रेलियाच्या युवा फलंदाजाकडे येताना दिसला. दरम्यान, त्याने कॉन्स्टासला खांद्याने धडक दिली, पण 19 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजानेही मागे न हटता प्रत्युत्तर दिले आणि मैदानावर काहीसे वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अखेर पंचांना हस्तक्षेप करावा लागला. यादरम्यान उस्मान ख्वाजाही आपला देशबांधव कॉन्स्टासला समजावताना दिसला. ही घटना पाहून एमसीजी मैदानात उपस्थित 90 हजारांहून अधिक लोकांनी आरडाओरडा सुरू केला.
IND vs AUS 4th Test : पहिला दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर, चार फलंदाजांनी झळकावली अर्धशतके…
या घटनेवर समालोचक ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगने कोहलीच्या या कृतीवर आक्षेप घेतला आणि मॅच रेफरीने त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे, असे सांगितले. अखेर मॅच रेफरीने कारवाई केली, त्यामुळे दंडाव्यतिरिक्त ‘किंग कोहली’ला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला. भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनीही कोहलीला असे करण्याची गरज नसल्याचे सांगितले.





