IND vs AUS 4th Test | रोहित, आकाशदीपला सरावादरम्यान दुखापत….

मेलबर्न – रविवारी सराव करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा व वेगवान गोलंदाज आकाशदीपला दुखापत झाली. मात्र ही दुखापत गंभीर नसून त्यानंतर दोघांनी हलका सराव केला.
येत्या गुरुवारपासून मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात होत आहे. लढतीच्या तयारीसाठी भारतीय संघाचा सराव सुरु होता. या सत्रात लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली व शुभमन गिल यांनी नवीन चेंडूने सराव केला. यावेळी कर्णधार रोहित शर्माने फिरकी गोलंदाजीसमोर सराव केला. या दरम्यान फिरकी गोलंदाजाला पूल मारण्याचा प्रयत्न करत असताना रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर मात्र सराव सत्र संपेपर्यंत रोहित चांगला चालताना दिसून आला. त्यानंतर त्याने इतर खेळाडूंशी संवाद साधला.
ब्रिस्बेन कसोटीत आपल्या फलंदाजीने भारतासाठी फॉलोऑन टाळणाऱ्या आकाशदीपने देखील फलंदाजीचा सराव केला. यावेळी त्याच्या हाताला दुखापत झाली. सराव सत्रानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने ही दुखापत किरकोळ असल्याचे सांगितले.
IND W vs WI W 1st ODI : मंधना-रेणुकाचे वादळ; पहिल्या वनडेत भारतानं वेस्ट इंडिजचा केला दारूण पराभव…
तो म्हणाला, क्रिकेट खेळताना अशा दुखापती होत असतात. मला वाटते की ज्या खेळपट्टीवर मी सराव केला, ती खेळपट्टी ही पांढऱ्या चेंडूसाठी होती. मात्र, ही दुखापत सामान्य असून कोणतीही गंभीर प्रकारची समस्या नाही, असे तो बोलताना म्हणाला.





