IND vs AUS 4th Test : मेलबर्नमध्ये भारताला पराभवाचा धक्का…! आता WTC Final मध्ये कशी पोहोचेल टीम इंडिया? जाणून घ्या, सोप्या शब्दात…

IND vs AUS 4th Test : मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाला 184 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियासाठीचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 चा मार्ग अधिक कठीण झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया की, मेलबर्न टेस्ट हरल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कशी पोहोचू शकते.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अजूनही टीम इंडिया दुसरी फाइनलिस्ट होण्याच्या शर्यतीत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.
Who will join South Africa at Lord’s in June 2025? #WTC scenarios 👉 https://t.co/JHhtCaLIZ9 pic.twitter.com/Vbe6vJew7W
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 30, 2024
सिडनी कसोटी जिंकणे अनिवार्य…
मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर आता WTC फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळली जाणारी कसोटी जिंकावी लागेल. टीम इंडिया सिडनीमध्ये WTC 2023-25 सायकलचा शेवटचा सामना खेळणार आहे, ज्यामध्ये जिंकणे अनिवार्य असेल. जर टीम इंडिया सिडनी कसोटी हरली किंवा सामना अनिर्णित राहिला तर त्यांच्या WTC फायनलमध्ये जाण्याच्या आशा पूर्णपणे संपुष्टात येतील.
टीम इंडियाने सिडनी कसोटी जिंकल्यास गुणतालिकेत संघ तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. पण, असं जेव्हा होईल तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 1-0 किंवा 2-0 ने पराभूत होईल. याउलट ऑस्ट्रेलियानं आता एका सामन्यात विजय मिळवला की त्यांचे स्थान पक्के होईल. ऑस्ट्रेलियाला आता तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 1 सामना भारताशी आणि दोन सामने श्रीलंकेशी खेळायचे आहेत. तसेच भारताविरुद्ध सिडनी कसोटी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुढील मालिकेत श्रीलंकेविरुद्ध 1-0 किंवा 2-0 असा विजय नोंदवला तर टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून थेट बाहेर पडेल.
दक्षिण आफ्रिकेने प्रथमच गाठली अंतिम फेरी…
सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला आणि या विजयासह आफ्रिकेच्या संघानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2025) अंतिम फेरीत थेट धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत (ICC World Test Championship 2023-2025) पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथमच WTC फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मागील आवृत्तीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता तर WTC च्या पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. यामध्ये भारताला पहिल्या व दुसऱ्या अशी दोन्ही आवृतीच्या WTC स्पर्धेत पराभव स्विकारावा लागला होता.





