IND vs AUS 4th Test : बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस ठरला ऐतिहासिक, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत नवा विक्रम झाला प्रस्थापित…

IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. कसोटीचा पहिला दिवस पूर्णपणे कांगारू फलंदाजांच्या नावावर होता. दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने स्कोअर बोर्डवर 6 गडी गमावून 311 धावा केल्या होत्या.
19 वर्षीय फलंदाज सॅम कोन्स्टासने पदार्पणाच्या सामन्यातच बॅटने खळबळ उडवून दिली. त्याचवेळी उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथही फॉर्मात दिसले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. टीम इंडियाचे गोलंदाजी आक्रमण कांगारूंच्या फलंदाजांसमोर पूर्णपणे असहाय दिसले.
मेलबर्नमध्ये रचला गेला नवा विक्रम…
दरम्यान, मेलबर्न कसोटीच्या पहिल्याच दिवशी एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वास्तविक, एकूण 87 हजार 242 प्रेक्षक मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित (Record Attendance) होते, हा एक नवीन विक्रम आहे. 77 वर्षांच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचलेल्या प्रेक्षकांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे.
🏏 Not a bad turnout on Boxing Day! 🏟️
Day one of the Fourth Test has seen a record attendance attendance between the Aussies and India in Tests in Australia. 🇦🇺 🇮🇳
💻📝 Analysis: https://t.co/oIxxEwWbnK #AUSvIND pic.twitter.com/VFIl2SWKVc
— ABC SPORT (@abcsport) December 26, 2024
एबीसी स्पोर्ट्सने पोस्ट केले की, “बॉक्सिंग डे टेस्टमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीचा हा एक नवीन विक्रम आहे.” मेलबर्न स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते आणि चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या दमदार कामगिरीचा त्यांनी आनंद लुटला.
IND vs AUS 4th Test : पहिल्या दिवशी चार ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अर्धशतके
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांनी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासने 60 धावा केल्या. तर उस्मान ख्वाजाने 57 धावांचे योगदान दिले. मार्नस लॅबुशेन 72 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर स्टीव्ह स्मिथ 68 धावा करून नाबाद राहिला. या मालिकेत भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला जसप्रीत बुमराहने शून्यावर बाद केले. मिचेल मार्श 4 धावा करून जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने 31 धावांचे योगदान दिले.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे तर जसप्रीत बुमराह हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांना बाद केले. या वेगवान गोलंदाजाने उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय आकाशदीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 बळी घेतला.





