IND vs AUS 2nd Test | भारतीय गोलंदाजीचा आम्ही समर्थपणे सामना करू – ॲलेक्स कॅरी

ॲडलेड – आगामी ६ डिसेंबरपासून येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या दिवस-रात्र क्रिकेट सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय आक्रमणाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरेल. बुमराहने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात आठ विकेट्स घेत भारताच्या २९५ धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कामगिरी करता आली नाही, त्यामुळे गोलंदाजांवर दबाव वाढला. असे असले तरीही, आमचा संघ एकसंघ असून चांगल्या रणनीतीसह मैदानात उतरणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ॲलेक्स कॅरी म्हणाला.
कॅरीने येथे बोलताना म्हणाला की, बुमराह निश्चितच एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो चांगली कामगिरी करत आहे. आमचे फलंदाज देखील जागतिक दर्जाचे आहेत आणि आम्ही त्याच्या गोलंदाजीचे मूल्यांकन केले आहे. आशा आहे की आम्ही त्याच्या पहिल्या दुसऱ्या स्पेलचा सामना करू शकू.
तो म्हणाला, “आम्हाला आमच्या फलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही बुमराहलाच नव्हे तर त्यांच्या इतर गोलंदाजांचाही सामना करण्याचा मार्ग शोधू. भारताने पहिल्या कसोटी सामन्यात काही नवीन गोलंदाजांसह मैदानात उतरला होता आणि त्यांनीही चांगली गोलंदाजी केली होती.
जोश हेझलवूडने केलेल्या वक्तव्याने ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरूममध्ये वादविवाद झाले होते. ॲलेक्स कॅरीने मात्र ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या. तो म्हणाला, “तुम्ही फलंदाजांना विचाराल तर, आम्हा सर्वांना चांगली कामगिरी करायची आहे आणि एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही तेथे शतक झळकावायला गेलात आणि जर तुम्ही तसे केले नाही, निराश होणे स्वाभाविक आहे.





