IND vs AUS : ॲडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भेदक गोलंदाज दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर…

ॲडलेड – ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी धुरा सांभाळणारे जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व नॅथन लॉयन या चौघांनी सातत्याने भारतीय संघाविरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा भेदक गोलंदाज जोश हेझलवूड जखमी झाल्याने तो ॲडलेड येथील बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या ६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये खेळणार नाही. त्यामुळे २०१५ नंतर प्रथमच भारताविरुद्धच्या कसोटी लढतीमध्ये हेझलवूड शिवाय स्टार्क, कमिन्स व लॉयन यांना खेळावे लागणार आहे.
वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. दुसरी कसोटी दिवस-रात्र असल्याने हेझलवूड त्याच्या लाईन व लेन्थमुळे घातक ठरू शकला असता. मात्र, आता त्याच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचे मोठे नुकसान होणार आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून हेझलवूडची भारताविरुद्धच्या घरच्या मैदानावर कसोटी सामन्याला मुकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
त्याचवेळी, २०१५ मध्ये सिडनी येथे (ॲडलेडमध्ये) खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा ऑस्ट्रेलिया येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटीत हेझलवूड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्यापैकी एका शिवाय तिघांना मैदानात उतरावे लागेल. ॲडलेड कसोटीपूर्वी भारताविरुद्ध सलग नऊ कसोटी सामन्यांचा भाग होते. हेजलवूडच्या जागी अष्टपैलू शॉन ॲबॉट आणि ब्रँडन डॉगेट या दोन अनकॅप्ड खेळाडूंनाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
JUST IN: Josh Hazlewood ruled out of the second #AUSvIND Test with uncapped duo called up. Full details 👇https://t.co/ZHrw3TUO8a
— cricket.com.au (@cricketcomau) November 30, 2024
ॲबॉट आणि डॉगेट
ॲबॉट आणि डॉगेट या दोघांचीही शेफिल्ड शिल्डमध्ये शानदार कामगिरीच्या जोरावर संघात निवड करण्यात आली आहे. काही काळ कसोटी संघाचा भाग असलेल्या ॲबॉटने शेफील्ड शिल्डच्या अंतिम फेरीत सिडनी क्रिकेट मैदानावर टास्मानियाविरुद्ध १६ षटकांत ७१ धावांत चार बळी घेतले. त्याच्या नावावर २६१ प्रथम श्रेणी बळींची नोंद आहे. त्याचवेळी डॉगेटने अलीकडेच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध फाइव्हरची कामगिरी केली होती. यासह शेफिल्ड शील्डच्या तीन सामन्यांमध्ये त्याच्या बळींची संख्या ११ झाली आहे. त्याने मॅके येथे भारत-अ विरुद्धच्या अनौपचारिक सामन्यात 15 धावांत सहा बळी टिपताना कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती.
दुसऱ्या कसोटीसाठी संभावित ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श (तंदुरुस्ती अंतर्गत), ब्यू वेबस्टर, शॉन ॲबॉट आणि ब्रँडन डॉगेट.





