Border–Gavaskar Trophy 2024 (IND vs AUS) : – भारताचा विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून धावासाठी झगडत होता. मात्र त्याने पर्थ येथील कसोटीमध्ये दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलिया संघातील मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघेही पहिल्या कसोटीत झटपट बाद झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार यांनी दोघांना विराट कोहलीसारखा स्वतः वर विश्वास ठेवून दमदार कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे.
पर्थ येथील कसोटीमध्ये लॅबुशेन भारतीय वेगवान गोलंदाजांविरुद्ध चाचपडत खेळला.त्याने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ३ धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. याचबरोबरीने स्मिथला पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजविरुद्धही संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार फलंदाज असलेला स्मिथ पहिल्या डावात गोल्डन डकवर बाद झाला. दुसऱ्या डावात देखील त्याला ६० चेंडूत केवळ १७ च धावा करता आल्या होत्या.
आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये पाँटिंग म्हणाला, पर्थमधील सर्व फलंदाजांपैकी मार्नसला सर्वात जास्त संघर्ष करताना दिसला. पहिल्या डावात खेळपट्टी काथोन होती हे मान्य केले तरी भारतीय गोलंदाजानी देखील चमकदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाज प्रतिभावान असले तरी त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी काही तरी करावेच लागणार असल्याचे पॉन्टिंगने सांगितले.
कोहलीला बलस्थानांची माहिती…
पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर विराट कोहलीने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. या संदर्भात बोलताना पॉन्टिंग म्हणाला, विराटला त्याच्या खेळावर विश्वास आहे. तो दुसऱ्या डावात अगदी दुसऱ्या खेळाडू सारखा खेळला. विरोधी संघाशी लढण्याऐवजी त्याने आपल्या बलस्थानांवर लक्ष्य केंद्रित केले. त्यामुळेच त्याला शतकी खेळी करण्यात यश मिळाले. कोहलीने जे केले तेच मार्नस आणि स्मिथ यांना करण्याची आवश्यकता असल्याचे पॉन्टिंगने सांगितले.
Border–Gavaskar Trophy 2024/25 : ॲक्शन व कौशल्यांमुळेच बुमराह भेदक गोलंदाज – स्टीव्हन स्मिथ
तुम्हाला जोखीम पत्करावीच लागेल…
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी भारतीय गोलंदाजानी उध्वस्त केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानी अधिक जोखीम घेऊन भारतीय गोलंदाजांवर दबाव आणावा, असे पॉन्टिंग सांगितले. जोखीम पत्कारून तुम्हाला समोरच्या गोलंदाजांना दबावात आणण्यासाठी मार्ग शोधावाच लागणार आहे. बुमराह सारखा गोलंदाज तुम्हाला धावा करण्याची संधी देणारच नाही. त्यामुळे तुम्हालाच जास्तीची जोखीम घ्यावी लागणार असल्याचे पॉन्टिंगने बोलताना सांगितले.