IND vs AFG Test : भारताचा ऐतिहासिक कसोटी विजय! एका डावाने अन् ३०० धावांनी अफगाणिस्तानला चिरडले; मानव-सुंदरची कमाल
IND vs AFG Test : शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अफगाणिस्तानला एक डाव आणि ३०० धावांनी पराभूत करून आपला सर्वात मोठा कसोटी विजय नोंदवला.

IND vs AFG Test India Beat Afghanistan Mullanpur : कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने सोमवार (८ जून) कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आपल्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. मुल्लानपूर येथे शनिवारी सुरू झालेला हा सामना भारताने अवघ्या तिसऱ्याच दिवशी संपुष्टात आणला. तिसऱ्या दिवसाचे तिसरे सत्र संपण्यापूर्वीच टीम इंडियाने अफगाणिस्तानचा एक डाव आणि ३०० धावांनी धुव्वा उडवला. भारताचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
२०१८ मधील वेस्ट इंडिजविरुद्धचा ८ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला (IND vs AFG Test )
या ऐतिहासिक विजयासह भारताने आपला सुमारे आठ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये राजकोट कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि २७२ धावांनी पराभव केला होता, जो भारताचा सर्वात मोठा विजय होता. आता अफगाणिस्तानविरुद्ध ३०० धावांनी विजय मिळवून भारताने नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये बंगळुरू येथे भारताने अफगाणिस्तानला एका डाव आणि २६२ धावांनी हरवले होते.
दोन्ही डाव मिळूनही अफगाणिस्तानला भारताचा स्कोअर गाठता आला नाही – (IND vs AFG Test )
Leaving New Chandigarh with a massive win under the belt 🇮🇳
A complete team performance from #TeamIndia 🤍
Scorecard ▶️ https://t.co/Au50EfVM30#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/MxUFJHvoq4
— BCCI (@BCCI) June 8, 2026
भारताने पहिल्या डावात ८ बाद ५६४ धावांवर डाव घोषित केला होता; ज्यामध्ये शुबमन गिल (१२६) आणि केएल राहुल (१००) यांची शतके, तर ऋषभ पंत व वॉशिंग्टन सुंदर यांची अर्धशतके सामील होती. भारताच्या या विशाल धावसंख्येसमोर अफगाणिस्तानचा संघ दोन्ही डाव मिळूनही २५० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही. अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या १५२ धावांवर आटोपला, तर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी त्यांना ११२ धावांवर ऑलआऊट केले. अफगाणिस्तानकडून दोन्ही डावात एकमेव रहमत शाहला अर्धशतक झळकावत आले.
मानव सुथार अन् वॉशिंग्टन सुंदरचा फिरकी चमत्कार! ( IND vs AFG Test)
Clinical from start to finish 👏
An unforgettable Test match in New Chandigarh ends with #TeamIndia securing their biggest ever win by an innings and 300 runs 🤍
Scorecard ▶️ https://t.co/Au50EfVM30#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RfmeJWSyh2
— BCCI (@BCCI) June 8, 2026
भारताच्या या विजयात फलंदाजांनंतर फिरकीपटूंनी कमाल केली. पहिल्या डावात पदार्पण करणाऱ्या २३ वर्षांच्या मानव सुथारने २२ षटकांत अवघ्या २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात अनुभवी वॉशिंग्टन सुंदरने ४ विकेट्स घेत अफगाण फलंदाजीचे कंबरडे मोडले, तर कुलदीप यादवने ३ आणि मानव सुथार व सिराजने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
या ऐतिहासिक कसोटी विजयानंतर आता दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १३ जून रोजी खेळवला जाईल. दुखापतीमुळे विराट कोहली या मालिकेतून बाहेर झाला असून त्याच्या जागी यशस्वी जयस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे. (IND vs AFG Test)





