पुसेगाव (प्रतिनिधी) – खोटं बोल पण रेटून बोल ही विद्यमान आमदारांची सवय आहे. महाराष्ट्रासह आपल्या साताऱ्याला राजकीय संस्कृती असून एक वाईट प्रवृत्तीचा आणि खुनशी राजकारणाचा लोकप्रतिनिधी लाभला हे दुर्दैव आहे. सगळ्याच बाबतीत त्यांची भूमिका खोटं बोलण्याची असते, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी विद्यमान आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
रोहित पवारांचा खोचक टोला,’राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन’
विद्यमान आमदाराने कोरेगाव देवस्थान संदर्भात बैठक घेतली. परंतु, तो विषय लांबच, तिथे माझ्यावर टीका करण्यात आली. माझं आव्हान आहे की त्यांनी जे आरोप केले त्याची चौकशी त्यांच्याच सरकारच्या काळात व्हावी ! हायवेच्या भ्रष्टाचारासंदर्भात त्यांना बोललो, मी त्यांची पोलखोल केली हे त्यांच्या जिव्हारी लागलं म्हणून ते खोटं बोलत आहेत. मी आजही यासंदर्भात मागणी करत आहे की कामाची चौकशी व्हावी आणि जे सामील असतील त्यांच्यावर कारवाई करावी. लोकांना वेठीस धरून पैसे उकळण्याचा प्रकार विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहे, याचा खुलासा मी लवकरच करेल.
रोहित पवारांचा खोचक टोला,’राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन’
कोरेगाव नगरपंचायतीमध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून निवडणुकीसाठी पैसे घेऊन कॉन्ट्रॅक्टरला सर्व कामे देण्यात आली, यामध्ये पार्टनर कोण आहे ? नगरपंचायतीच्या कामांमध्ये मी कधीही हस्तक्षेप केला नाही. ॲडव्हान्समध्ये पैसे घेऊन निवडणूक लढवली आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरला कामे दिली, हे सगळ्या नगरसेवकांना माहित आहेअसे त्यांनी सांगितले.
बाजारसमिती संदर्भात माझ्यावर जो आरोप केला त्यातील विद्यमान आमदाराने केलेले षडयंत्र मी लवकरच बाहेर काढणार आहे. बाजार समितीचे बजेट किती, योजना काय, एकंदरीत कामाची पद्धत काय असते. गद्दार विद्यमान आमदार आजवर एका पक्षाचे झाले नाही ते लोकांचे काय होणार… कार्यकर्त्यांचे काय होणार, असा प्रश्न त्यांनी केला.
असे अनेक प्रकार मतदारसंघात चालू आहे. सत्तेचा उन्माद एवढा वाढला आहे, की लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटायला लागला आहे आणि याचा लवकरच उद्रेक होईल ! जे काही आरोप केले जात आहेत त्याचे पुरावे देऊन बोलत चला अन्यथा आम्ही आपली पोलखोल करतच राहू, असा इशारा त्यांनी दिला.
लोकप्रतिनिधींनी विद्यमान आमदाराच्या गटात प्रवेश केला हे वृत्तपत्रांमध्ये दाखवतात. खरं म्हटलं तर त्यांचे काही कार्यकर्ते लोकांना फसवून नेत असतात, कामानिमित्त सर्वसामान्य लोक लोकप्रतिनिधीकडे जात असतात. त्यांचा लगेच प्रवेश केल्याची बातमी पसरवली जाते, असे त्यांनी सांगितले.
दुर्दैवाने सरकार आमचं नाही. विद्यमान आमदार पहिल्यांदा उद्धव ठाकरेंसोबत होते आता एकनाथ शिंदे सोबत आहेत. त्यांना फक्त केंद्र आणि राज्य सरकारचं कवच आहे. हे कवच निघालं तर फार मोठी पोलखोल होऊ शकते. सुरुवात तुम्ही केली होती मी केली नव्हती. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.