Satara: सातारा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग राज्यात प्रथम
Satara केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने मे 2026 मध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या संदर्भात सर्व राज्यांना मार्गदर्शिका पाठवली होती. या अनुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी 17 जुलै रोजी आणि प्राथमिक शिक्षण संचालकांनी 26 जुलै रोजी पत्र दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शनाप्रमाणे राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांचे पुनर्गठन अनिवार्य केले होते.

Satara: शिक्षण हक्क कायदा (आरटीई) 2009 च्या कलम 21 नुसार प्रत्येक शाळेमध्ये व्यवस्थापन समिती अनिवार्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी (एनईपी 2020) सुसंगत अशी ही शाळा व्यवस्थापन समिती असून, पालक, शिक्षक, स्थानिक प्राधिकरण आणि समुदायातील सदस्यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये व्यवस्थापन समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले असून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने मे 2026 मध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या संदर्भात सर्व राज्यांना मार्गदर्शिका पाठवली होती. या अनुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी 17 जुलै रोजी आणि प्राथमिक शिक्षण संचालकांनी 26 जुलै रोजी पत्र दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शनाप्रमाणे राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांचे पुनर्गठन अनिवार्य केले होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 3 ऑगस्ट रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी जिल्ह्यातील शाळांना व्यवस्थापन समित्यांचे पुनर्गठन करण्यासंदर्भात पत्रे पाठवली होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शकेचा अभ्यास करुन, सोप्या भाषेतील मार्गदर्शिका ज्ञानप्रकाश फाउंडेशनच्यावतीने तयार करण्यात आली. तीदेखील पत्रासोबत पाठवण्यात आली होती. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिका अनुदानित व अंशतः अनुदानित अशा तीन हजार 419 शाळांमध्ये नवीन मार्गदर्शिकेप्रमाणे शाळा व्यवस्थापन समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले आहे. राज्यात शंभर टक्के कामगिरी करणारा सातारा जिल्हा एकमेव ठरला आहे. यासाठी जिल्हा परिषद, फलटण येथील शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि ज्ञानप्रकाश फाउंडेशन यांनी एकत्रित प्रयत्न केले.
काही शाळांमधील व्यवस्थापन समित्यांच्या निवडीसाठी शिक्षण विभागाचे अधिकारी आणि ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी वारंवार आढावा घेऊन ही प्रक्रिया पूर्ण केली. जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समित्यांच्या दरमहा बैठकीसाठी जिल्हास्तरावरून विषय दिले जातात. या विषयांची निवड शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता विजय भिसे व ज्ञानप्रकाश फाउंडेशनकडून केली जाते.
या कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण समिती सभापती तेजस्विनी कदम यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, अनिस नायकवाडी, शबनम मुजावर, विजय भिसे, संभाजी कानवटे, ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संदीप जगताप, सर्व गटशिक्षणाधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा व विभागाचे अभिनंदन केले.





