Monkeypox Virus : मंकीपॉक्सचा धोका वाढला; ‘या’ राज्यात सापडला दुसरा रुग्ण, तर देशातील रुग्णसंख्या….

Monkeypox Virus – केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. ही व्यक्ती एर्नाकुलमची रहिवासी आहे. केरळच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यक्तीची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुबईहून केरळला परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले असून देशातील हा तिसरा रूग्ण आहे. यापूर्वी दुबईहून केरळला परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली होती.
या 38 वर्षीय व्यक्तीवर मलप्पुरम जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. 9 सप्टेंबर रोजी देशात पहिला रुग्ण आढळला होता. मंकीपॉक्सच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सल्ला जारी केला आहे.
मंकीपॉक्सची प्रकरणे उद्भवू नयेत यासाठी राज्यांनी आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्याच वेळी, सर्व राज्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधांच्या तयारीचा आढावा घेतला पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेने 14 ऑगस्ट रोजी मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. डब्लूएचओने मंकीपॉक्सबाबत आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची दोन वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. देशातील कोविड-19 चे पहिले प्रकरण केरळमध्येही नोंदवले गेले.





