दिल्लीत प्रदूषणाच्या पातळीत वाढ
Increase in pollution levels in Delhi

नवी दिल्ली – देशाची राजधानीत दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी खालावत आहे. दिल्लीत सातत्याने हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत येत आहे. आज सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा 290 इतका नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणालीने दिली आहे.
थंडीचा कहर वाढत असतानाचा प्रदूषणाची पातळी वाढली आहे. यामुळे दिल्लीकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणालीने दिलेल्या माहितीमुसार नोएडातील हवा गुणवत्ता निर्देशांक देखील खराब श्रेणीत नोंदवला गेला आहे. त्याठिकाणी 293 हवा निर्देशांकाची नोंद करण्यात आली आहे. तर गुरुग्राममध्ये 225 हवा निर्देशांकाची नोंद झाली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये देखील कडाक्याची थंडी आहे. शहरात थंडी असली तरी वायू प्रदूषणापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वायू प्रदूषणाची पातळी गेल्या आठवड्यात तीव्र होती. या आठवड्यात ती सामान्य झाली आहे. ही सामान्य प्रदुषणाची पाटळी येत्या दोन ते तीन दिवसांत खराब श्रेणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशमधील इतर शहरांमध्ये देखील हवा गुणवत्ता निर्देशांक खराब होण्याची शक्यता आहे.





