pune : येत्या दोन दिवसांत कडाका वाढणार

शहरात किमान तापमान १३ ते १७ अंशाच्या आसपास
पुणे – शहरासह उपनगरातील किमान तापमान १२ अंशाच्या पुढे गेल्याने थंडीची लाट ओसरली असली तरी पहाटे धुके, थंडीचा जोर आहे. शनिवारी माळीण येथे सर्वात कमी १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहर परिसरातील किमान तापमान १३ ते १७ अंशाच्या आसपास नोंदविले गेले आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान ७ अंशापर्यंत खाली आले आणि थंडीच्या लाटेने पुणेकर गारठले. नंतर मात्र किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्याने थंडीची लाट ओसरू लागली. आता किमान तापमान १३ अंशावर पोहचले असून, दुपारचा हवेतील गारवा कमी झाला आहे. शनिवारी (दि. ६) दिवसभर हवामान कोरडे असल्यामुळे उन्हाचा हलकासा चटका जाणवत होता.
रात्री मध्यवर्ती भागात थंडी फारशी जाणवत नसली तरी उपनगरातील पाषाण, एनडीए, औंध, वारजे, धायरी, खडकवासला, कात्रज, आंबेगाव, हांडेवाडीत थंडी चांगलीच जाणवत होती. गेल्या २४ तासांत किमान तापमानात किंचीत घट झाली असून, पुढील दोन ते तीन दिवसात किमान तापमानात आणखी घट होईल आणि थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
किमान तापमान
१३.७, पाषाण १३.५, शिवाजीनगर १४.१, चिंचवड १८.१, वडगांवशेरी १८.७, माळीण १२.८, निमगिरी १३.३, तळेगाव दाभाडे , आंबेगाव १४.६, बारामती १४.७, भोर १६, गिरीवन १८,अंश





