नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि मुस्लिम समाजातील प्रमुख धर्मगुरू, विचारवंत यांच्यात गुरुवारी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. दिल्लीतील हरियाणा भवन येथे झालेल्या या बैठकीला संघाच्या वरिष्ठ नेतृत्वासह 70 हून अधिक मुस्लिम धर्मगुरू, मौलाना आणि अभ्यासक सहभागी झाले. दोन्ही समुदायांमधील गैरसमज दूर करून सलोखा आणि संवाद वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या बैठकीमुळे हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये संवाद वाढवण्याच्या संघाच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा गती मिळाली आहे. दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये देखील मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरुंची भेट घेतली होती.