वाघोली – वाघोली तालुका हवेली या गावचा समावेश पुणे महानगरपालिकेत होऊन जवळपास दोन वर्षाचा कालावधी होत आला असून या कालावधीत पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वाघोलीतील उद्यानांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत असून पुणे महानगरपालिकेने याबाबतीत लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामपंचायतच्या स्थानिक नेतृत्वाने लक्ष दिल्याने सध्या या उद्यानांमध्ये स्वच्छता व साफसफाई राखली जात असून पुणे महानगरपालिकेकडून याबाबतीत जास्तीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक व योग्य त्या उपाययोजना कधी होणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
वाघोली मधील ग्रामस्थ ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या पुढाकाराने तसेच नागरिकांच्या लोकवर्गणीच्या मदतीने वाघोली मध्ये उभे राहिलेल्या वाघेश्वर उद्यान व प्रभू श्रीराम उद्यान या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने व ग्रामस्थांच्या पुढाकाराने साफसफाई राखली जात आहे पुणे महानगरपालिकेच्या वतीने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत आठवड्यातून काही दिवस मनपाचे कर्मचारी येत असून कचरा उचलून नेण्याचे फक्त काम त्यांच्याकडून केले जात आहे.
उर्वरित काम हे स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच ग्रामस्थांच्या मदतीने केले जात आहे याबाबतीत पुणे महानगरपालिकेने उद्यानांची दुरावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वाघोली मधील वाघेश्वर मंदिर परिसरात मंदिर देवस्थानच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने नानांनी पार्क व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे याही ठिकाणी उद्यान उभे राहिले असल्याने त्या ठिकाणी जास्तीच्या कर्मचाऱ्यांची मागणी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
वाघोलीत विरंगुळा केंद्रांना आधार देण्याची गरज. लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वाघोली मधील उद्याने ही विरंगुळा केंद्र ठरत असून जवळपास तीन लाख लोकसंख्येच्या या भागासाठी उद्यान मधील नाना नानी पार्क व लहान मुलांच्या खेळण्याच्या साहित्यासाठी वेळोवेळी तपासणी व योग्य त्या उपाययोजना मनपाकडून होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
वाघेश्वर मंदिर परिसरात असणाऱ्या हिरव्या नटलेल्या परिसरात नागरिकांची येणे जाणे वाढले असल्याने याही ठिकाणी जास्तीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक मनपाकडून त्वरित व्हावी व मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे
राजेंद्र सातव पाटील
अध्यक्ष, वाघेश्वर देवस्थान वाघोली
ग्रामपंचायत, ग्रामस्थ, व बांधकाम व्यवसायिकांच्या लोकवर्गणीतून उभे राहिलेल्या वाघेश्वर उद्यानामध्ये परिसर स्वच्छता करण्यासाठी मनपाकडून तातडीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
रामभाऊ दाभाडे
माजी जिल्हा परिषद सदस्य
वाघोली मधील प्रभू श्रीराम उद्यानातील साफसफाई ग्रामस्थांच्या पुढाकाराने आज अखेरपर्यंत करण्यात आली आहे महानगरपालिकेकडे यासंदर्भात कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली असून मनपाकडून याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
संदीप सातव
माजी उपसरपंच, वाघो