पुण्यात मटार, फ्लॉवर, घेवडा स्वस्त, फळभाज्यांची आवक वाढली

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -पावसाने उघडीप घेतल्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे फ्लॉवर,मटार आणि घेवड्याच्या भावात घट झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत.
येथील बाजारात रविवारी (दि.7) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालात कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून मिळून हिरव्या मिरचीची 10 ते 12 ट्रक, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, इंदौर येथून 7 ते 8 टेम्पो गाजर, बेळगाव आणि धारवाड येथून 250 गोणी मटार, मध्य प्रदेश येथून लसणाची 14 ते 15 ट्रक इतकी आवक झाली. तर राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची 800 ते 900 पोती, भेंडीची 5 ते 6 टेम्पो, गवारची 5 ते 6 टेम्पो, टोमॅटोची 11 ते 12 हजार पेटी, फ्लॉवरची 14 ते 15 टेम्पो, कोबीची 3 ते 4 टेम्पो, सिमला मिरचीची 8 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंगाची 100 पोती, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांद्याची 50 ते 60 ट्रक, बटाटा आंध्र प्रदेश आणि इंदौर येथून 30 ते 35 ट्रक बटाटा इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा100-140
बटाटा180-220
लसूण50-400
आले सातारी100-300
भेंडी300-500
गवार :
गावरान व सुरती500-700
टोमॅटो80-120
दोडका350-400
हिरवी मिरची300-400
दुधी भोपळा150-250
चवळी300-400
कारली :
हिरवी300-400
पांढरी300-350
पापडी300-400
पडवळ250-300
काकडी160-220
फ्लॉवर100-120
कोबी200-250
डिंगरी300-400
नवलकोल140-150
ढोबळी मिरची350-450
तोंडली :
कळी300-350
जाड150-200
शेवगा300-500
गाजर250-300
वालवर400-450
बीट80-120
घेवडा500-600
कोहळा100-150
आर्वी200-250
घोसावळे300-350
ढेमसे200-250
भुईमुग शेंग400-450
मटार :
स्थानिक600-650
परराज्य600-650
पावटा350-400
तांबडा भोपळा60-100
सुरण180-200
मका कणीस60-100
नारळ (शेकडा)1000-1600.





