पुण्यात प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळांनी बजावला मतदानाचा हक्क; विजयाबाबत व्यक्त केला विश्वास

Murlidhar Mohol | अनेक वर्षांनी होत असलेल्या राज्यातील मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीचे मतदान गुरुवारी होत आहे. सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू होईल आणि ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यत चालेल. ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार हे १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील. आपल्या मतदानाचा हक्क बजवण्यासाठी अनेकांनी सकाळीच मतदान केंद्रावर येण्यास सुरूवात केली आहे.
पुण्यातही कोथरूड परिसरात माजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला. तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी देखील परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे. याशिवाय भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना, पुणेकरांचे संपूर्ण समर्थन भारतीय जनता पार्टीला राहील, असा विश्वासही व्यक्त केला. तसेच जास्तीत पुणेकरांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा, असेही त्यांनी आवाहन केले आहे. Murlidhar Mohol |
#WATCH | Pune, Maharashtra: Former Union Minister and senior BJP leader Prakash Javdekar says, “Today, there are municipal elections in Maharashtra, and I cast my vote during my morning walk. This is the primary duty of every citizen, and therefore, everyone should come and vote… https://t.co/cfaTAAizzR pic.twitter.com/FLyNfPvSkw
— ANI (@ANI) January 15, 2026
मतदान प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – जावडेकर
तर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर म्हणाले, “आज महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि मी मतदान केले आहे. हे प्रत्येक नागरिकाचे प्राथमिक कर्तव्य आहे, आणि म्हणूनच प्रत्येकाने येऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला त्वरित मतदान केले पाहिजे. फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या दुहेरी इंजिन सरकारच्या अंतर्गत आम्ही अशा प्रकारचे काम करतो.”
दरम्यान, पुण्यातील 4000 मतदान केंद्रावर 35 लाख मतदार मतदान करणार असून ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी मतदान करण्यासाठी दिसून येत आहे. पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. पुण्यात चौरंगी लढत भाजपला दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Murlidhar Mohol |
यासोबतच गणेश बिडकर, रविंद्र धंगेकर, वसंत मोरे, रुपाली पाटील, प्रशांत जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरुद्ध अजित पवार अशीच लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. यात आता कोण बाजी मारणार हे आता उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.





