PMC Election: मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क प्रभाग 21मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला वेग; पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

PMC Election: मुकुंदनगर–सॅलिसबरी पार्क प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला चांगला वेग आला आहे. कुमार सिद्धचल सोसायटी, स्वप्नपूर्ती सोसायटी, मार्केट यार्ड, पारसनीस कॉलनी ते आदर्श नगर असा पदयात्रेचा मार्ग होता. या पदयात्रेला परिसरातील नागरिकांकडून जोरदार व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रचारादरम्यान उमेदवार सुगत (श्रीशैल) चंद्रशा दसाडे, शोभा संतोष नांगरे, श्वेता संग्राम होनर-कामठे आणि बाळासाहेब अटल यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. विकासकामांची भूमिका मांडताना त्यांनी परिसरातील मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आदी नागरी सुविधांशी निगडित प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन उमेदवारांनी दिले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर शाश्वत उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करणाऱ्या विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रचारसंवाद पदयात्रेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना परिसरातील मतदारांचा सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.



