मुंबई – जन्मदात्या आईवर आपल्या चार महिन्यांच्या तान्ह्या बाळाला वाहून जाताना पाहण्याची वेळ आली. आईच्या डोळ्यासमोरून चार महिन्यांचे तान्हुले बाळ हातातून सुटल्याने शेजारील नाल्यातून वाहत गेल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला आहे. आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
वाढत्या पावसामुळे मुंबईतील सर्वच रेल्वे गाड्यांचे टाईमटेबल कोलमडले आहे. अशात कल्याण रेल्वे स्थानकाहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या गाड्या ठाकुर्लीच्या आधी किंवा ठाकुर्ली स्थानकाच्या पुढे जावून डोंबिवली रेल्वे स्थानकावर अडकून पडत आहेत. अशात ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ उभी असलेली लोकल ट्रेन बराच काळ एका जागेवर खोळंबून असताना अनेक प्रवाश्यांनी वैतागून रेल्वे रुळावरून कल्याण साईडने चालत जाऊन रस्त्या कापण्याचा निश्चय केला.
लोकल अडकून पडल्याने अनेकांनी कल्याणच्या दिशेने चालत जाण्याचा निर्णय केला. मात्र ही वाट सोपी नव्हती चालायला जेमतेम रस्ता त्यात बाजूला वाहणारा नाला. अशात एका बाळाला घेऊन काका आणि बाळाची आई चालत होते. बाळ काकाच्या हातातून निसटले आणि थेट नाल्याचे वाहत्या पाण्यात पडले. पाण्यासोबत बाळाला वाहताना पाहून आईने हंबरडा फोडला. आईने यावेळी प्रचंड आक्रोश केला.
यावेळेसचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अग्नी शमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बाळाचा शोध सध्या सुरु आहे.
View this post on Instagram
या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत –
1) डेक्कन क्विन- 12123 सीएसएमटी-पुणे 19.7.23 आणि12124 पुणे-सीएसएमटी 20.7.23
2) सिंहगड एक्सप्रेस- सीएसएमटी -पुणे 19.07.23 आणि 11010 पुणे-सीएसएमटी20.07.23
3) डेक्कन एक्स्प्रेम- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 11007 सीएसएमटी-पुणे 20.07.23
4) इंटरसिटी- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 12127 सीएसएमटी-पुणे 20.07.23
5) इंद्रायणी- पुणे-सीएसएमटी 19.07.223 आणि 22105 सीएसएमटी-पुणे 20.07.23