पुणेकरांसाठी महत्वाचे; दिवाळीत लसीकरणाला तीन दिवस सुट्टी

पुणे – दिवाळीत लसीकरणाला तीन दिवस सुट्टी असून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी मात्र अर्धा दिवस लसीकरण मोहीम चालवली जाणार आहे.
दिवाळीनिमित्त महापालिकेला काही दिवस सुट्टी राहणार आहे. त्या दरम्यान महापालिकेने लसीकरण मोहीमही बंद ठेवली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने कमी रिस्पॉन्स मिळतो. त्यामुळेच लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. मंगळवार आणि बुधवारी संपूर्ण दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. गुरुवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असल्याने त्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी अर्धा दिवस लसीकरण सुरू राहणार असून, सकाळच्या सत्रात हे लसीकरण होणार आहे.
आज 198 केंद्रांवर लस
करोना प्रतिबंधक लसीचे मंगळवारी 198 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लस उपलब्ध असणार आहेत. कोविशील्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 250 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सिनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 500 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.





