Impact Player Rule : इम्पॅक्ट प्लेयरचा वापर देशांतर्गत स्पर्धेत करावा – ग्रॅमी स्मिथ

Impact Player Rule – आयपीएल आणि त्यातील इम्पॅक्ट प्लेयरचा नियम, या तुलनेत आम्ही कमी क्रिकेटमध्ये कमी प्रयोग करत आहोत. आयपीएल, एस ए लीग अशा देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धामध्ये प्रयोग म्हणून इम्पॅक्ट प्लेयर या नियमाचा वापर करावा, असा सल्ला दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार व दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एसए 20 लीगचा संचालक असलेल्या ग्रॅमी स्मिथने (Graeme Smith) दिला.
सध्याच्या घडीला इम्पॅक्ट प्लेयर या नियमावर उलटसुलट चर्चा सुरु आहे. या नियमाला काहींनी पाठिंबा दिला आहे, तर काही विरोधात आहेत. अनेक खेळाडूंनी देखील यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात बोलताना ग्रॅमी स्मिथने इम्पॅक्ट प्लेयर एसए 20 या मालिकेत लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. असे करणे क्रिकेटसाठी घाईचे होणार असल्याचे तो बोलताना म्हणाला.
आम्ही स्पर्धेला मजबूत बनविताना क्रिकेटच्या या पैलूला समजून घ्यावे. सर्वानी चांगले क्रिकेट खेळावे, ज्याने प्रेक्षकांना जास्तीत जास्त आनंद मिळू शकेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे देखील ग्रॅमी स्मिथ म्हणाला.
Team India : देशभरातून प्रतिभाशाली खेळाडू क्रिकेटमध्ये येत आहेत – राहुल द्रविड
इम्पॅक्ट प्लेयर नियमांमुळे संघाला कोणत्याही क्षणी खेळाडूंची बदली करता येते. आयपीएलच्या मागील हंगामात या नियमाचा वापर करण्यात आला होता. या नियमामुळे आक्रमक शैलीच्या फलंदाजाना जास्त संधी मिळत आहे.





