Pune : सिंहगड रोड-धायरी परिसरात आज ८६ गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक; वाहतुकीत बदल

पुणे : सिंहगड रोड व धायरी परिसरात आज एकूण ८६ गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. ही मिरवणूक नऱ्हे, धायरी, उंबऱ्या गणपती चौक, लाडली चौक ते धायरी फाटा या मार्गावरून जाणार आहे.
वाहतूक पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावर वाहतुकीवरील निर्बंध लागू राहतील. नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग :-
धायरी फाटा – नांदेड सिटी गेट – दळवी फाटा
पीएमपीएल बसेस व चारचाकी वाहनांना या मार्गाने वळविण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी विशेष सेवा पुरविण्याचे निर्देश पीएमपीएल प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, विसर्जन मिरवणूक शांततापूर्ण व सुरक्षित पार पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे.





