Narayana Murthy | उत्पादकता वाढविण्यासाठी आठवड्यात कामाचे दिवस 6 असण्याची गरज- नारायण मूर्ती

मुंबई – भारतामध्ये उत्पादकता वाढण्याची गरज आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी कर्मचार्यांचे आठवड्यात कामाचे दिवस सहा असण्याची गरज आहे. मात्र काही क्षेत्रात 1986 पासून कामाचे पाच दिवस करण्यात आले आहे, ही अयोग्य बाब असल्याच्या मताचा पुनरुच्चार इन्फोसिस कंपनीचे संस्थापक यांना एन आर नारायण मूर्ती यांनी केला आहे.
एका मध्यम संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक नेतृत्व परिषदेत बोलताना मूर्ती मिळाले की, कर्मचार्यांनी आठवड्यात 70 तास काम केले पाहिजे. तरच भारताचा विकास होईल. या माझ्या मतात मी बदल केलेला नाही. माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी या भूमिकेत बदल करणार नाही.
ते म्हणाले की, विकास त्यागामुळे आणि कामामुळे होतो. आराम करण्यामुळे होत नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातले 100 तास काम करतात. हा आदर्श कर्मचार्यांनी अंगीकारण्याची गरज आहे. जर्मनी आणि जपानमध्ये दुसर्या महायुद्धानंतर सर्वांनी प्रचंड काम केले.
खनिज तेलाच्या किमती कमी होतील – पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी
त्यामुळे ते देश वेगाने आपल्या पुढे गेले. ते म्हणाले की मी स्वतः आठवड्यात साडेसहा दिवस आणि रोज 14 तास काम केले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही कितीही हुशार असले तरी कठोर परिश्रमास पर्याय नाही. सरकारची कार्यक्षमता वाढविण्यासाठी बाहेरून व्यवस्थापकांची नियुक्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.





