नवी दिल्ली – कॅनडा आणि अमेरिकेने खनिज तेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा वाढेल आणि तेलाचे दर कमी होतील. याचा भारताला फायदा होणार आहे, असे पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी सांगितले.
ओपीइॅसी या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने गेल्या अनेक वर्षापासून तेलाचे उत्पादन मर्यादित केल्यामुळे खनिज तेलाचे दर सध्या जास्त आहेत. यामुळे अमेरिका आणि कॅनडाने तेल उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जागतिक खनिज तेल पुरवठा वाढेल.
महाग खनिज तेलामुळे भारतासारख्या देशांना महागाईचा सामना करावा लागतो. मात्र खनिज तेल स्वस्त होण्याची लक्षणे आहेत. तसे झाले तर भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल असे ते म्हणाले.