Narayana Murthy and Sudha Murthy Biopic | इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांची जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. नारायण मूर्ती हे आयटी क्षेत्रातील कामासाठी ओळखले जातात, तर त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती सामाजिक कार्यासोबतच पुस्तके लिहिण्यासाठी ओळखल्या जातात. आता या जोडीचे आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. या चित्रपटावर लेखक-दिग्दर्शक-निर्माता अश्विनी अय्यर-तिवारी आणि नितेश तिवारी काम करत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि नारायण मूर्ती यांच्या मातृभाषेत म्हणजेच कन्नडमध्ये बनवला जाणार आहे. या बायोपिकबद्दल नारायण मूर्ती खूप उत्साही असून त्यांनी चित्रपट निर्मात्यांना लवकरात लवकर या चित्रपटावर काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, या चित्रपटाचे नाव अद्याप फायनल झाले नसून सध्या ‘मूर्ती’ या नावाखाली हा प्रकल्प केला जात आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी अश्विनी अय्यर-तिवारी आणि नितेश तिवारी आयडॉल कुटुंबातील प्रत्येक लहान आणि मोठी माहिती गोळा करण्यात गुंतले आहेत. जेणेकरून चित्रपटाची कहाणी त्यांच्या आधारावर उत्तमरित्या बनू शकेल. Narayana Murthy and Sudha Murthy Biopic | या चित्रपटाबाबत अश्विनी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाची स्क्रिप्ट अजून लिहिली जात आहे. यासाठी वेळ नक्कीच लागतो, पण त्यांची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवताना मला आनंद होत आहे. मला असा चित्रपट बनवायचा आहे ज्यामध्ये प्रेक्षक चित्रपटाशी एकरुप होऊ शकतील. केवळ कमर्शिअल हिट चित्रपट बनवणे हा उद्देश नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या चित्रपटासाठी अनेकजण उत्सुक आहेत. Narayana Murthy and Sudha Murthy Biopic | हेही वाचा: पुन्हा लघुशंकेचा घृणास्पद प्रकार: जाब विचारला म्हणून महिलेवर वार, वडगाव येथील घटना; आरोपींकडून एडी भाईचा उल्लेख