“अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर…”; रेव्ह पार्टीत जावयाला रंगेहाथ पकडताच खडसेंची प्रतिक्रिया

Eknath Khadse on Rave Party | पुण्यातील खराडी परिसरातील रेव्ह पार्टीत शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली असून यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचा पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, “\गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे, त्यानुसार असं काही घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पण मी फारसे काही यावर बोलणार नाही. पुण्यात घटना घडली असे सांगितले जात आहे. मी हे मीडियातूनच पाहिले आहे. जर ती खरी रेव्ह पार्टी असेल आणि त्या रेव्ह पार्टीत आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्याचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा, अशी आमची अपेक्षा आहे.
“पोलीस काहीही करू शकतात…”
“पोलीस काहीही करू शकतात, असे जनभावना जनमानसात आहे. त्या संदर्भात नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे. ब्लड रिपोर्ट आले पाहिजे. सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणे चुकीचे होईल. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते सहन केले जाणार नाही. त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू,” असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या रेव्ह पार्टीत थेट जावईच सापडल्याने एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. Eknath Khadse on Rave Party |
रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त
तर दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. ‘पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच, परंतु हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. परंतु, हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आणि राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे,’ असे रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे. Eknath Khadse on Rave Party |
चुप बैठो नही तो रेड करुंगा – सुषमा अंधारे
तर सुषमा अंधारे यांनी देखील, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे म्हंटले आहे. खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्यासाठी हा एक संदेश आहे. चुप बैठो नही तो रेड करुंगा, असा संदेश असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.
हेही वाचा :





