‘अभिनेत्री झाली तर कुणी लग्न करणार नाही…’तृप्ती डिमरीने केला खुलासा

Tripti Dimri । अभिनेत्री तृप्ती डिमरी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने इतकी प्रसिद्धीझोतात आली होती. आज तिच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. मात्र करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला.
कतरिना कैफच्या ‘के बाय कतरिना’ या यूट्यूब चॅनेलवर तृप्ती म्हणाली, “मी उत्तराखंडची आहे, पण माझा जन्म आणि पालनपोषण दिल्लीत झाले आहे. त्यामुळे माझे आई-वडील आणि कुटुंबीय दिल्लीत राहतात. मी जेव्हा मुंबईला शिफ्ट झाले तेव्हा तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. समाजात असे काही लोक होते जे माझ्या आई-वडिलांना अशा गोष्टी सांगायचे की ते आपल्या मुलीला या व्यवसायात का पाठवत आहेत. तिचा संपून जाईल. ती चुकीच्या लोकांसोबत असेल. स्वतःसाठी चुकीचे निर्णय घेईल. तिच्याशी कोणी लग्न करणार नाही. ती लग्नच करणार नाही.”
मात्र काही काळानंतर माझ्या आई वडिलांनी ‘लैला मजनू’ हा चित्रपट पहिला. त्यांना माझा खूप अभिमान वाटला. तृप्तीचा हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये ती अविनाश तिवारीसोबत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद अली यांनी केले होते. 6 वर्षांनंतर हा चित्रपट यावर्षी 9 ऑगस्ट रोजी पुन्हा प्रदर्शित झाला. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली होती. लोकांना हा चित्रपट खूप आवडला.
2018 मध्ये ‘पोस्टर बॉईज’ नावाचा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून तृप्तीने पदार्पण केले. या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होते. अभिनयासोबतच श्रेयसने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
तृप्तीचा पुढचा चित्रपट ‘भूल भुलैया 3’ यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्या विरुद्ध कार्तिक आर्यन आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालन आणि माधुरी दीक्षित देखील आहेत. अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ही दिवाळीला रिलीज होणार आहे. म्हणजेच दोन चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे. या भांडणाची जोरदार चर्चा आहे.




