Tripti Dimri : तृप्ती डिमरीने प्रेमाबद्दल व्यक्त केलं मत म्हणाली “जिथे भावना खोल….”
Tripti Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरीने तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगितले. तसेच तिने प्रेमाबद्दल मत मांडले.
Tripti Dimri : तृप्ती डिमरी ही बॅालीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चित्रपटांची चाहते नेहमी मोठ्या आतुरतने वाट पाहत असतात. अॅनिमल चित्रपटातील तिच्या भूमिकेने तिला रातोरात स्टार केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या भूमिका साकारल्या. आता तृप्ती ओ रोमिओ चित्रपटात शाहिद कपूरसोबत स्क्रिन शेअर करत आहे.
या चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत असून, तृप्तीच्या भूमिकेचे देखील कौतुक होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तृप्तीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासोबतच तिच्या मते प्रेम म्हणजे काय असते? याबद्दल सांगितले.
प्रेमाबद्दल प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येक जण त्याकडे आपापल्या पद्धतीनं पाहतो. मी खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवते. प्रेम आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात असतं. ज्याच्यावर आपण प्रेम करू शकत नाही, त्याच्याबद्दल तिरस्कारही निर्माण होत नाही; कारण प्रेम आणि द्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मत तृप्तीने मांडले.
पुढे ती म्हणाली, जिथे भावना खोल असतात, तिथेच प्रेमाचा आणि रागाचाही उगम होतो. सर्वांत प्रामाणिक भावना जर कुठली असेल, तर ती प्रेमच, कारण प्रेम असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थानं जिवंत असतो.
अॅनिमल चित्रपटाच्या यशानंतर तृप्तीला अनेक चित्रपटांच्या अॅाफर्स मिळाल्या होत्या. याविषयी सांगताना तृप्ती म्हणाली, ‘अॅनिमल’च्या यशानंतर माझ्याकडे सिनेमांची रांग लागली. २०२४ या एकाच वर्षात मी ‘बंड न्यूज’, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ आणि भूल भुलैय्या ३ या सिनेमांमध्ये दिसले. आता ‘ओ रोमियो’ बरोबरच ‘स्पिरिट आणि ‘माँ बहन’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रत्येक टप्प्यावर नवं काहीतरी शिकण्याचा मी प्रयत्न करते असल्याचे तृप्तीने नम्रपणे सांगितले.
हेही वाचा : Earthquake In Iran : तीव्र भूकंपाने इराण हादरला ; ५.५ रिश्टर स्केलची तीव्रता ,जगाला अणुचाचण्यांचा संशय





