Pune News : पुरावे मिळाल्यास आपणही लढू ! ईव्हीएम विरोधात राज ठाकरेंनी केली पुण्यात घोषणा

Updated On:
Pune News : पुरावे मिळाल्यास आपणही लढू ! ईव्हीएम विरोधात राज ठाकरेंनी केली पुण्यात घोषणा

पुणे – ईव्हीएम विरोधात मी स्वत: २०१४ मध्ये आवाज उठविला होता. मात्र, त्या वेळी कोणताही राजकीय पक्ष माझ्या सोबत उभा राहिला नाही. आता लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर सर्वच विरोधीपक्ष ईव्हीएम अचूकतेबाबत शंका उपस्थित करत आहेत. याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे मिळाल्यास आपणही त्याविरोधात लढा देऊ. मात्र, आता आपण या पक्षांच्या सोबत जाणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी आपल्या उमेदवारांना सांगितले.

विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात मोठ्या पराभवाचा सामाना करावा लागला असून, पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील पराभूत उमेदवार, तसेच पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीत सर्वच उमेदवारांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली. त्यावर ठाकरे यांनी या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली.

सर्व निवडणूका लढविणार
या बैठकीत ठाकरे यांनी सर्व पराभूत उमेदवारांना खचून न जाता पुन्हा नव्याने पक्ष, तसेच पक्षसंघटनेसाठी काम करण्याच्या सूचना केल्या. यापुढे राज्यातील सर्व निवडणुका पक्ष स्वबळावरच लढणार असून, त्यासाठीही संघटन मजबूत करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या. याशिवाय त्या- त्या वेळी पक्षाकडून कोणासोबत जायचे अथवा नाही, याचा निर्णय घेतले जातील. मात्र, तूर्तास आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी