Amit Thackeray Balgandharva Rangmandir : पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे व्यंग चित्रपदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी हजेरी लावली. या प्रदर्शनातील व्यंग चित्रांचे अमित ठाकरे यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली. लहान असताना वडिलांनी मला रोज एक चित्र काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र तेव्हा मी त्यांचे ऐकले नाही. जर मी त्यांचं ऐकलं असतं तर आज या ठिकाणी माझं देखील व्यंगचित्र दिसलं असतं, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली. पुढे ते म्हणाले, मला आज एवढं वाईट वाटतंय जो माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला तो मी ऐकला असता त माझ एक व्यंगचित्र इथं लागलं असतं. जो मी ऐकला नाही. ही कला तुम्हाला कोणी शिकवून चालत नाही. ती खरंतर तुमच्या आत असावी लागते. असे देखील अमित यावेली बोलताना म्हणाले. एक तास व्यंगचित्राला देत जा माझे अनेक मित्र चित्रकला शिकले आहेत. त्यांनी व्यंगचित्र शिकण्याचा प्रयत्न केला. पण आजपर्यंत त्यांनी एक साधी रेषा काढता येत नाही. त्यामुळे ही कला तुमच्या आत आहे. मुलांनो ही तुमच्यातली कला आहे, ती घालवू नका, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच जो वडिलांनी मला सल्ला दिला तोच मी तुम्हाला देईन, असे देखील त्यांनी नमूद केले. कामात कितीही व्यस्त झालात तरी आयुष्यात तरी एक तास व्यंगचित्राला देत जा असही त्यांनी यावेळी सांगितलं.