दत्ता गाडेच्या वकिलाच्या सहाय्यकाचे अपहरण नाही तर…..; साहिल डोंगरेसोबत काय घडलं? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
Updated On:

Pune News | काल रात्री स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचे सहाय्यक वकील साहिल डोंगरे यांचे अपहरण झाल्याची बातमी मीडियामध्ये आली होती. डोंगरे यांचे अज्ञातांनी अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. वकील साहिल डोंगरे यांचे अपहरण झालेच नव्हते तर त्यांचा अपघात झाला होता, अशी माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या शरीरावर जखमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.





