Kangana Ranaut : संसदेत १३० व्या घटना दुरुस्ती विरोधकांकडून जोरदार गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून त्या थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे भिरकावल्या. आता यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आता या मुद्याला घेऊन अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगणा राणावत हिने विरोधकांवर खळबळजनक आरोप केला आहे. विरोधकांनी फक्त कागदच नाहीतर, गृहमंत्री अमित शहांवर दगडही फेकले, असा धक्कादायक आरोप तिने केला आहे. मंडी येथील माध्यमांशी तिने संवाद साधला त्यावेळी हा आरोप केला आहे. काय म्हणाली भाजप खासदार कंगणा रणावत? गृहमंत्री विधेयक मांडत असताना विरोधी पक्षनेते वेलमध्ये आले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहांवर टीकेची झोड उठवली आणि विधेयकाच्या प्रती फाडून त्यांच्या तोंडावर फेकल्या. केवळ कागदच फेकले गेले नाही, तर अमित शहांवर दगड फेकही करण्यात आली. कल्पना करा की, ते आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा माईक तोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली, असा खळबळजनक आरोप खासदार कंगणा राणावत हिने केला आहे. काय आहे १३० घटना दुरुस्ती विधेयक? या दुरुस्तीअंतर्गत गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यांच्या पदांचा राजीनामा द्यावा लागेल, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. हेही वाचा : बुध ग्रह आकुंचन पावतोय; त्रिज्या 5.6 किमीने कमी, शास्त्रज्ञांचा नवा खुलासा