मी तोंड उघडले तर अडचण होईल

खासदार सुप्रिया सुळे यांचा टीका करणाऱ्या गयारामांना इशारा

शिक्रापूर-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कधीही, कोणावर अन्याय केलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर अथवा पक्षाच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर खपवून घेणार नाही आणि मी तोंड उघडले तर तुम्हाला अडचण होईल, असा इशाराच खासदार सुप्रिया सुळे यांनी गयारामांना दिला.

सणसवाडी (ता. शिरूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, सदस्या कुसुम मांढरे, राजेंद्र जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष रवी काळे, दिलीप वाळेकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते, माजी उपसभापती मोनिका हरगुडे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, ज्ञानेश्वर थेऊरकर, मयूर करंजे यांसह आदी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, कोणीही पक्षातून गेल्यास पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीने काही बोललेले नसल्याचे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी मी आणि राहुल गांधी व हर्षवर्धन पाटील कधी भेटले हे दाखवून द्यावे आणि याबाबत मी इंदापूरला जाऊन बोलणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांसह आदींनी मनोगत व्यक्त केले.

  • बांदल यांची अुनपस्थिती
    माजी आमदार अशोक पवार म्हणाले, सत्ताधारी आमदार हे फक्त निवडणुकांच्या तोंडावर विकासाचे गाजर दाखवत आहेत. एक बहाद्दर लोकसभेला इकडे आले आणि पुन्हा पळून गेले असा टोला मंगलदास बांदल यांचे नाव न घेता लावला. मतदारांनी शिरूर-हवेली असा भेद न करता राष्ट्रवाडी कॉंग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केले.
  • मंगलदास बांदल यांची गैरहजेरी लक्षणीय
    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे शिवसेना प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना बांदल यांनी गैरहजेरी दिसून आली. सणसवाडी येथील कार्यकर्ता मेळाव्याला बांदल उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; परंतु बांदल यांची गैरहजेरी या मेळाव्यादरम्यान चर्चेची ठरली.
  •  कडकनाथ कोंबड्यांच्या फसवणुकीबाबत निवेदन
    शिरूर तालुक्‍यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबड्यांच्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी लाखो रुपये गुंतविले आहेत. या शेतकऱ्यांची संबंधित कंपनीकडून फसवणूक झाली असल्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके व सहकाऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले. यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)