काँग्रेस सत्तेवर असल्यास भ्रष्टाचार हा ‘एक्सीलेटर’ वर आणि विकास ‘वेंटीलेटर’ वर असतो – नरेंद्र मोदी

देहरादून – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देहरादून येथील जाहीर सभेत विरोधकांवर तुफान टीका केली आहे. काँग्रेस पक्षावर टीका करताना नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि भ्रष्टाचार यांचे अतूट नाते असल्याचे सांगत, काँग्रेस पक्ष सत्तेवर असल्यास भ्रष्टाचार हा एक्सीलेटर वर आणि विकास मात्र वेंटीलेटर वर असतो, असा आरोप केला आहे.
करप्शन और कांग्रेस का साथ अटूट है। ऐसी जुगलबंदी है जो अलग हो ही नहीं सकती।
करप्शन को कांग्रेस चाहिए और कांग्रेस को करप्शन।
कांग्रेस सरकार में करप्शन एक्सीलेटर पर रहता है और विकास वेंटीलेटर पर रहता है: पीएम नरेन्द्र मोदी #ModiLaoDeshBanao pic.twitter.com/aDkJgDPz32
— BJP (@BJP4India) April 5, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहरादून येथील जाहीर सभेत बोलत होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबावर अप्रत्यक्षपणे टीका करत, जे पूर्वी स्वतःला देशाचे भाग्यविधाता म्हणून समजत होते, ते आता जामिनावर बाहेर असल्याचे म्हंटले आहे. हेलिकॉप्टर घोटाळ्याचा उल्लेख करत मोदींनी अहमद पटेल आणि गांधी कुटुंबियांवर लाच घेतल्याचा गंभीर आरोप यावेळी केला.
आपको याद होगा कि आपका ये चौकीदार हैलिकॉप्टर घोटाले के कुछ दलालों को दुबई से उठाकर ले आया था।
इटली के मिशेल मामा और दूसरों दलालों से पूछताछ हुई है।
इसके आधार पर दायर चार्जशीट के अनुसार हैलीकॉप्टर घोटालों के दलालों ने जिन्हें घूस दी है उसमें एक AP और दूसरा FAM है: पीएम मोदी pic.twitter.com/BQYXPahWoA
— BJP (@BJP4India) April 5, 2019
पुढे बोलताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना काँग्रेसचा जाहीरनामा हा भारतीय सेना दलाचे मनोबल कमी करणारा असल्याचे म्हंटले आहे. तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे पाकिस्तानातील लोक खुश असल्याची टीका मोदींनी केली आहे.





