जामखेड – धनगर समजला विरोधी पक्षात भाजप मध्ये देवेंद्र फडणवीस आसताना आरक्षण देतो म्हणून सांगितले होते, मात्र सत्ता आल्यावर दिले नाही. गेल्या ७० वर्षांनपासुन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर बांधव चौंडी येथे अमरण उपोषणास बसले आहेत. मात्र अकरा दिवस होऊनही राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. मात्र चौंडी येथिल उपोषण कर्त्यांच्या जीवाला काही झाले तर याची झळ सरकारला सोसावी लागेल आशा संतप्त भावना रास्तारोको दरम्यान धनगर बांधवांनी व्यक्त केल्या.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे उपोषण उपोषण सुरू आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समिती व सर्वच पक्षाच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक या ठीकाणी शनिवार दि १६ रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
खर्डा चौकातील रास्ता रोको आंदोलना दरम्यान धनगर बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना पुढे सांगितले की चौंडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने धनगर बांधव आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. मात्र राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे हे जामखेड दौरा टाकतात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे झालेला दौरा रद्द करतात मात्र उपोषणस्थळी भेट देण्यासाठी वेळ नाही याचा अर्थ की ते धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत.
धनगर समाजाला भुलवत हा लढा एक दिवसासाचा नसतो तर त्याला वेळोवेळी लढावे लागते. धनगर समाजाला लढत ठेऊन मतदानादिवशी आरक्षणाचे गरज दाखवायचे काम प्रत्येक पक्षातील पुढारी करत आहेत. मात्र आता आरक्षण लागु करणार्यांनाच मतदान करणार असल्याचा इशारा धनगर बांधवांनी केला आहे. तसेच जर धनगर आरक्षण मिळाले नाही तर मंत्र्यांना तुम्हाला महाराष्ट्रात फीरु देणार नाही समाजाची मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत धनगर समाज शांत बसणार नाही.
धनगर आरक्षण कृती समितीचे विकास मासाळ मोहन गडदे, वैजिनाथ पोले, डॉ. कारंडे, चिलगर मेजर, मोहन देवकाते, ऑड. संग्राम पोले, डॉ. कैलास हजारे. रंजित कारंडे, राजेंद्र मासाळ, गणेश सुळ, बबन देवकाते, नवनाथ महाराज कोळेकर, आनंद खरात, आनिल श्रीरामे, देविदास गोरे, यांच्या सह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रा. मधुकर (आबा) राळेभात, अॅड अरुण जाधव, मंगेश आजबे, रमेश आजबे, सुंदरदास बिरंगळ, विकी सदाफुले, अमित जाधव, संतोष गव्हाळे, महारुद्र महानवर, आण्णासाहेब वायसे, निलेश पवार, बाळासाहेब कारंडे, महेश निमोणकर, अतिष पारवे, यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.