ICC Women’s T20 World Cup 2024 : सहा वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध चुका करू शकत नाही : मंधाना

ICC Women’s T20 World Cup 2024 : भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या एक दिवस आधी सांगितले आहे की, ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही आणि सहावेळच्या चॅम्पियन संघावर विजय मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल.
ऑस्ट्रेलियाने मागील तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. दीड वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केल्यानंतर माजी कर्णधार मेग लॅनिंगने निवृत्तीची घोषणा केली होती, त्यानंतर एलिसा हिलीने पदभार स्वीकारला आहे.
𝗠𝗮𝗿𝗸 𝗬𝗼𝘂𝗿 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿 🗓️#TeamIndia‘s schedule for the ICC Women’s #T20WorldCup 2024 is 𝙃𝙀𝙍𝙀 🔽 pic.twitter.com/jbjG5dqmZk
— BCCI Women (@BCCIWomen) August 26, 2024
मंधानाने शुक्रवारी होणाऱ्या ‘अ’ गटातील न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी सांगितले की, “विश्वचषकातील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि आम्हाला त्या सर्व सामन्यांमध्ये 100 टक्के देणे आवश्यक आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका हे बलाढ्य संघ आहेत, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध आम्ही चुका करू शकत नाही.”
मंधाना पुढे म्हणाली की, “ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आम्हाला आमची सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. तो एक महान संघ आहे आणि त्यांना पराभूत करणे हे मोठे आव्हान आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हा नेहमीच भावनांनी भरलेला असतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्ध्यामध्ये दोन्ही संघांच्या समर्थकांच्या भावनांचा समावेश असतो. असे नाही की खेळाडू एकमेकांशी बोलत नाहीत पण दोन्ही देशांतील वाढत्या भावनांमुळे सामना अधिकच रोमांचक होतो.”
IND vs BAN : भारताच्या विजयाने WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ..! जाणून घ्या, पॉइंट टेबलची स्थिती…
पुढे ती म्हणाली की, “माझ्यासाठी विश्वचषकातील प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि आम्ही त्या सर्वं सामन्यामध्ये आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू. इथल्या उष्णतेत दिवसाचे सामने आव्हानात्मक असतील पण देशासाठी खेळताना कोणतेही निमित्त चालणार नाही. त्यासाठी योग्य ती तयारी करूनच मैदानात उतरावं लागेल”





