ICC Women’s batting rankings 2024 | स्मृती मंधानाची टी-20 क्रमावारीत झेप, विंडीजविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीचा झाला फायदा…

ICC Women’s batting rankings 2024 | भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने आयसीसी क्रमवारीत आपला ठसा उमटवला आहे. या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत धमाकेदार खेळी केली होती. आता त्याचा फायदा तिला आयसीसी क्रमवारीत झाला आहे.
स्मृती मंधानाने आयसीसी महिला टी-20 क्रमवारीत आपला झेंडा रोवला आहे. ती तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. मंधानाला 1 स्थानाचा फायदा झाला आहे. ती 753 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
Smriti Mandhana in ICC Rankings:
– No.2 at ODI Rankings.
– No.2 at T20i Rankings. pic.twitter.com/zyNktikv7Q
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 24, 2024
अशी आहे टॉप 5 ची स्थिती….
महिलांच्या टी-20 क्रमवारीत बेथ मुनी 757 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. स्मृती मानधना दुसऱ्या तर हेली मॅथ्यूज 748 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर ताहलिया मॅकग्रा 748 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. लॉरा वोल्वार्ड 736 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
इतर भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. ती 10 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर गेली आहे. जेमिमाह रॉड्रिग्जनं एका स्थानाची झेप घेतली आहे. ती सध्या 618 गुणांसह 14व्या स्थानावर आहे.
स्मृतीची वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिकेतील कामगिरी…
स्मृती मंधानाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. तिने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी खेळली होती. पहिल्या सामन्यात तिने 54 धावा, दुसऱ्या डावात 62 आणि तिसऱ्या सामन्यात मंधानाच्या बॅटमधून 77 धावा निघाल्या होत्या. मंधाना हिने भारतासाठी 148 टी-20 सामन्यांमध्ये आतापर्यंत 29.38 च्या सरासरीने 3 हजार 761 धावा केल्या आहेत.





