Champions Trophy 2025 : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला भिडणार भारत-पाकिस्तान…..

ICC Men’s Champions Trophy 2025 schedule : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. टीम इंडिया पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामनाही दुबईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलसाठी यूएईची निवड केली होती. त्यामुळे भारतीय संघ आपले सर्व सामने यूएईमध्ये खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. पण जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर अंतिम सामना दुबईत खेळला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना कराचीमध्ये 19 फेब्रुवारीला होणार आहे. यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. हा सामना 20 फेब्रुवारीला होणार आहे. अफगाणिस्तानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. हा सामना कराचीत होणार आहे. 22 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे.
भारताचे सामने…
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानं आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामना रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारतीय संघ गट टप्प्यात दमदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर रोहितची सेना दुबईत 4 मार्च रोजी या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळेल.
Check out the full fixtures for the ICC Champions Trophy 2025. pic.twitter.com/oecuikydca
— ICC (@ICC) December 24, 2024
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संपूर्ण वेळापत्रक….
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम, कराची)
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 | अंतिम आणि उपांत्य फेरीचे सामने कुठे खेळवले जातील?
भारतीय संघ दुबईत आपले सर्व सामने हायब्रीड मॉडेलनुसार खेळणार आहे. जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली तर जेतेपदाचा सामना दुबईत होणार आहे. जर रोहितची सेना अंतिम फेरीत पोहोचली नाही, तर अशा परिस्थितीत स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल.
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च – अंतिम सामना – गद्दाफी स्टेडियम, लाहोर
यावेळी उपांत्य फेरीसह अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पावसामुळे उपांत्य फेरीतील 1 व 2 सामने पहिल्या दिवशी (4 व 5 मार्च) पूर्ण होऊ शकले नाहीतर दुसऱ्या दिवशी (5 व 6 मार्च) उर्वरित सामने होतील. तसेच अंतिम फेरीच्या सामन्याच्या बाबतीतही आहे. म्हणजेच पावसामुळे 9 मार्चला अंतिम सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर या स्थितीत उर्वरित सामना 10 मार्चला होणार आहे.





