आजपासून रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार, भारताचे सामने कधी? एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक

Champions Trophy 2025 : आजपासून (19 फेब्रुवारी) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जवळपास 8 वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, भारताने पाकमध्ये जाण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने पार पडेल.
भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 15 सामने खेळले जातील. 9 मार्चला अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेची सुरुवात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामधील सामन्याने होईल. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानं आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
भारताचे गटफेरीतील सामने पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील महामुकाबला 23 फेब्रुवारीला पार पडेल. स्पर्धेचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होतील. त्याआधी 2 वाजता नाणेफेक होईल.
विजेत्यांना मिळणार 20 कोटी रुपये
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या विजेत्या संघाला तब्बल 2.24 मिलियन डॉलर (जवळपास 20 कोटी रुपये) एवढी बक्षीसाची रक्कम मिळणार आहे. उपविजेत्या संघाला 1.12 मिलियन डॉलर आणि सेमीफायनलमध्ये पराभत होणाऱ्या प्रत्येक संघाला 5.60 लाख डॉलर्स एवढी रक्कम दिली जाईल. यंदाची एकूण बक्षीस रक्कम 6.9 मिलियन डॉलर एवढी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गटविभागणी
- अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश
- ब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचे सामने
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रंगणार आहे.
टीम इंडिया 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडेल. जर भारतीय संघ गट टप्प्यात दमदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर दुबईत 4 मार्च रोजी या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळेल.
ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक
- 19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
- 20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
- 21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम, कराची)
- 22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
- 23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
- 24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
- 25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
- 26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
- 27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
- 28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
- 01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
- 02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
- 04 मार्च- उपांत्य फेरी 1, दुबई
- 05 मार्च- उपांत्य फेरी 2, लाहोर
- 09 मार्च- अंतिम सामना- लाहोर/दुबई
- 10 मार्च – रिझर्व्ह डे





