Vijay Hazare Trophy 2024-25 : तब्बल 11 षटकार अन् 15 चौकार… मुंबईच्या 17 वर्षीय फलंदाजाने मोडीत काढला यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम…

Ayush Mhatre World Record : मुंबईचा 17 वर्षीय उदयोन्मुख फलंदाज आयुष म्हात्रे याने यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. आयुषने विजय हजारे टूर्नामेंटमध्ये चमकदार कामगिरी करताना 181 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान आयुषने 15 चौकार आणि 11 गगनचुंबी षटकार ठोकले. यासह आयुष हा लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 150 धावा करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. यशस्वीने 2019 मध्ये केलेला विक्रम त्याने उद्ध्वस्त केला आहे.
यशस्वीने 2019 मध्ये झारखंड विरुद्ध खेळताना 17 वर्षे 291 दिवस इतके वय असताना 150 धावांची खेळी केली होती, तर आयुषने 17 वर्षे 168 दिवस इतके वय असताना ही कामगिरी केली आहे. 2019 मध्ये, यशस्वीने रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडला, ज्याने 19 वर्षे आणि 63 दिवस इतके वय असताना ही कामगिरी केली होती.
Maiden List A century for 17 years old Ayush Mhatre against nagaland 👏
Follow CricWave for domestic cricket updates 🏏 #AyushMhatre #VijayHazareTrophy2024 #VijayHazareTrophy #BCCIDomestic #bccicricket pic.twitter.com/IfRjKIFloo
— CricWave (@thecricwave) December 31, 2024
मुंबईचे नागालँडसमोर 404 धावांचे आव्हान….
नागालँडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आयुषने हा विक्रम आपल्या नावे केला. सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या आयुषने 117 चेंडूंचा सामना करत 181 धावांची उत्कृष्ट खेळी केली. याव्यतिरिक्त शार्दुल ठाकरूने अवघ्या 28 चेंडूंचा सामना करत 73 धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावून 403 धावा केल्या आहेत.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा विजयासाठी 404 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या नागालँड संघानं 34 षटकात 6 बाद 108 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. त्यांना विजयासाठी 96 चेडूंत 296 धावांची आवश्यकता आहे. सध्याची नागालँड संघाची स्थिती पाहता त्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे.





