Tukaram Mundhe : पदभार स्वीकारताच आयुक्त तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच राज्यात पुन्हा एकदा आपला दणका दाखवण्यास सुरुवात केली आहे.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. २५ मे रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना विशेष धाडी आणि जप्ती मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यभरात अभूतपूर्व कारवाई करण्यात आली आहे. (Tukaram Mundhe)
मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली. (Tukaram Mundhe)
अधिकाऱ्यांनी राज्यभरातील ५३ आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी ३४ ठिकाणी गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात २५ एफआयआर दाखल करण्यात आले असून ३३ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच ५ वाहने जप्त करण्यात आली असून २७ आस्थापने सील करण्यात आली आहेत. (Tukaram Mundhe)
या कारवाईदरम्यान सुमारे २०.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई विभागात १९ आस्थापनांवर कारवाई करून ती सील करण्यात आली असून १९ जणांविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. (Tukaram Mundhe)
दरम्यान, प्रशासनाने निकृष्ट आणि संशयास्पद अन्नपदार्थांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड पेये, खाद्यतेल, मिठाई, फरसाण, आईस्क्रीम, ताडी, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थ अशा विविध खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. (Tukaram Mundhe)
या मोहिमेत २३ आस्थापनांवर छापे टाकून सुमारे २८ लाख ७८ हजार ५७२ रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. (Tukaram Mundhe)
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या धडक मोहिमेमुळे भेसळखोर आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून राज्यभरात अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Tukaram Mundhe)





