IAS Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा मोठा झटका! पंचतारांकित हॉटेलवरील कारवाईवरून ‘FDA’ ला फटकारले
IAS Tukaram Mundhe : आयएएस तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.

IAS Tukaram Mundhe : नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या कारवाईप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. (IAS Tukaram Mundhe)
नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला असला, तरी संबंधित आस्थापनाला आपली बाजू मांडण्यासाठी आणि आवश्यक ती पूर्तता करण्यासाठी योग्य वेळ देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. (IAS Tukaram Mundhe)
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान एफडीएच्या मनमानी पद्धतीवर ताशेरे ओढले. नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाने संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. अचानक परवाना निलंबित केल्यामुळे संबंधित व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते, याची जाणीव प्रशासनाने ठेवणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (IAS Tukaram Mundhe)
यावेळी न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण प्रश्नही उपस्थित केला. एखाद्या रुग्णालयाचा परवाना तत्काळ रद्द किंवा निलंबित केला तर उपचार सुरू असलेले रुग्ण हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का? अशा परिस्थितीत प्रशासनाने परिणामांचा विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. (IAS Tukaram Mundhe)
या प्रकरणात एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २ जुलै रोजी हॉटेलची तपासणी केली होती. त्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आणि अन्न व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे हॉटेलला त्वरित सेवा बंद करावी लागली होती. (IAS Tukaram Mundhe)

हॉटेल व्यवस्थापनाने न्यायालयात सांगितले की, सर्व आवश्यक नियमांची पूर्तता करण्यात आली असून एफडीएने नव्याने तपासणी करून परवाना निलंबित करण्याचा निर्णय मागे घ्यावा. यावर एफडीएने शनिवार-रविवारमुळे तातडीने तपासणी शक्य नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. (IAS Tukaram Mundhe)
मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत, “कारवाई करताना वार पाहून निर्णय घेतला जातो का?” असा सवाल उपस्थित केला. तसेच एफडीए आयुक्त कार्यालयाला संबंधित हॉटेलची तातडीने नव्याने तपासणी करून पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले. (IAS Tukaram Mundhe)





