पूजा खेडकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ; अरेरावी दमदाटी करत बारामतीत अन् मुळशीत जमीन बळकावल्याचा आरोप

IAS Probationer Officer Puja Khedkar । पुण्यात स्वतःच्या खासगी ऑडीवर लाल दिवा लावणारी आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा नवनवे कारनामे उघडकीस येत आहे.
पूजा खेडकर यांनी अपंग असलेले सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष असल्याचे सर्टिफिकेट दाखवून आयएएस पदरात पाडून घेतल्याची माहिती समोर येत असतांनाच आता तिच्याकडे ऐकून किती संपत्ती आहे यावर दावे केले जात आहे. स्वत: पूजाकडे 17 कोटी रुपयांची संपत्ती आहे. याची चौकशी व्हायला नको का? असाही प्रश्न विचारला जात आहे.
IAS officer Puja Khedkar’s parents, having a non-creamy layer certificate, possess property that includes 110 acres of agricultural land, violating the Agricultural Land Ceiling Act, 6 shops (1.6 lakh sq ft), 7 flats, including one in Hiranandani; 900 grams of gold, diamonds, a… pic.twitter.com/V9u1P5CQ0O
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 11, 2024
अशात आता या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पूजा खेडकर नवे तर त्यांच्या कुटूंबियांवरही गंभीर आरोप करण्यात येत आहे. खेडकर कुटूंबियांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचं ट्वीट विजय कुंभार यांनी केलं आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान खरेदी केली असल्याचं बोललं जातं आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्यानं खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे. खेडकर कुटुंबीयांनी मुळशीमध्येही अरेरावी आणि दमदाटी करुन जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे.





