‘हे गुन्हेगारी अन् बेजबाबदारीमुळे… ‘ दिल्लीतील UPSC विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर प्रियांका गांधी संतापल्या

IAS Coaching Centre । दिल्लीतील जुने राजेंद्र नगर येथील कोचिंग सेंटरच्या तळघरात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांनी X वर एक पोस्ट लिहिली.
IAS Coaching Centre । प्रियंका गांधी यांची पोस्ट
‘कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना हृदयद्रावक आहे. मी देवाकडे त्या तीन मृत विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करते. या मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करते. अलीकडेच एका विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. पटेल नगरमध्ये दूरवरच्या ठिकाणाहून येथे आलेल्या मुलांचे आयुष्य त्यांच्यापासून हिरावून घेतले जात आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे.
IAS Coaching Centre । दोषींवर कारवाई करावी
प्रियंका गांधींनी पुढे लिहिले की, ‘प्रत्येक बांधकाम, प्रत्येक क्रियाकलाप जे बेकायदेशीर आणि प्राणघातक आहेत, ज्या भागात स्पर्धात्मक विद्यार्थी राहतात त्या भागात सुधारणा केली पाहिजे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे’
हे वाचले का ?
‘बायोमेट्रिक्समुळे…’, राव आयएएस अकादमीमधील 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू ; प्रत्यक्षदर्शीचा मोठा खुलासा





