Ukraine-Russia war : युक्रेनवर रशियाचा हल्ला.! ७ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी
Ukraine-Russia war : रशियाने गुरुवारी रात्री युक्रेनवर पूर्व ते पश्चिमेपर्यंत चौफेर भीषण हल्ले चढवले आहेत. या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये किमान ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Ukraine-Russia war – रशियाने गुरुवारी रात्री युक्रेनवर पूर्व ते पश्चिमेपर्यंत चौफेर भीषण हल्ले चढवले आहेत. या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये किमान ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पूर्वेकडील निप्रोपेत्रोव्स्क आणि पश्चिमेकडील ल्विव्ह या भागांत सर्वाधिक जीवित व वित्तहानी झाली आहे. रशियाने युक्रेनियन शहरांवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली असून आता जवळपास दर आठवड्याला असे मोठे हल्ले केले जात आहेत.
प्रादेशिक लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेक्सेंडर हंझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले. मृतकांमध्ये ६ वर्षांची मुलगी आणि ११ व १७ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश आहे. (Ukraine-Russia war)

Ukraine-Russia war : युक्रेनवर रशियाचा हल्ला.! ७ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी
ल्विव्हचे महापौर अँड्री साडोव्ही यांनी सांगितले की, पहाटे ४:४५ च्या सुमारास शहरावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यात २० हून अधिक निवासी इमारती, एक शाळा आणि दोन बालवाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथे जखमींचा आकडा ३० वर पोहोचला असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. (Ukraine-Russia war)
रशियन सैन्याने किव्ह शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला, ज्यामध्ये एका ३१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. शहरात निवासी इमारती, बाजारपेठ, गॅरेज आणि वाहनांचे नुकसान झाले आहे.
तसेच किएव्हच्या जवळ असलेल्या ब्रोव्हारी भागात ५ जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या लष्करी व आपत्कालीन बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.





