Dharmaveer 3 | स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर 2’ असे चित्रपट आले आहेत. धर्मवीर 2 मध्ये आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं दाखवण्यात आलं. मात्र आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला याबाबत विविध चर्चा कायमच होत असतात. त्यावरून आता एकनाथ शिंदेंनी ‘धर्मवीर ३‘ बाबत मोठं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर 3 हा चित्रपट आलाच तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, असे म्हंटले आहे. एका कार्यक्रमात धर्मवीर 3 चित्रपट येणार का? त्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर शिंदे म्हणाले की, “आनंद दिघे यांचं काम काही एक दोन चित्रपटातून मांडता येणार नाही, त्यांचं काम मोठं आहे. पण धर्मवीर 3 चित्रपट आला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल. कारण त्यानंतर पुढे काय झालं हे मलाच माहिती आहे.” त्यामुळे आता धर्मवीर ३ मध्ये काय असेल याची उत्सुकता कायम आहे. विरोधकांना हरण्याचा कॉन्फिडन्स “साडे तीन वर्षाच्या सरकारला मी 100 टक्के मार्क देणार आहे. आम्ही तिघेजण तीन शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत. आम्हाला जो विजय मिळाला ती जनतेने दिलेली पोचपावती आहे. नगरपालिका निवडणूकीत विरोधक दिसले नाहीत. विरोधकांना हरण्याचा कॉन्फिडन्स आहे. फेसबुक लाईव्हवरुन तरी सभा करायच्या होत्या,” असा टोलाही शिंदे यांनी लगावला. Dharmaveer 3 | दिल्लीतील भेटीबाबत शिंदे काय म्हणाले? पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी दिल्लीत गेलो किंवा दरेगावाला गेलो तरी चर्चा होते. आम्ही एनडीएचा मोठा घटकपक्ष म्हणून दिल्लीत मोदीजी, अमितजी यांची भेट घेतो. कोणत्याही नाराजीसाठी त्यांना भेटत नाही. राज्य पातळीवरचे प्रश्न आम्ही तिघे सोडवतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही जातो. पंतप्रधान मोदी एनडीच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत, त्यांचे हात मजबूत करायचे आहेत,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. Dharmaveer 3 | दरम्यान, धर्मवीर चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली. २०२२ मध्ये शिवसेना फुटली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाला आव्हान देऊन एकनाथ शिंदेंनी ४० हून अधिक आमदारांना बरोबर घेत बंड केलं. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी धर्मवीर २ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानानंतर धर्मवीर ३ची चर्चा रंगली आहे. हेही वाचा: “राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लिनचीट देऊन मोकळे होतात”; दानवेंनी शेअर केलेल्या व्हिडीओवर ठाकरेंच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया