Bhaskar Jadhav : नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, ऐन अधिवेशन काळात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या बंडलचे काही व्हिडीओ एक्सवरून पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ‘सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही’, असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे. एक्सवरून त्यांनी एकूण तीन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओवर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून अंबादास दानवे यांनी पुरावे सादर करावे. दानवेंना कुणी विचारत नाही. त्यांना कुठलं काम उरलं नाही, असे ते म्हणाले. या व्हिडीओवरून राजकारण तापले असून, नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर यायला सुरुवात झाली आहे. ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी करत “तुमच्याच सत्ताधारी लोकांकडे एवढी कॅश येतेच कुठून असा संतप्त सवाल केला आहे. असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लिनचीट देऊन मोकळे होतात, प्रत्येक गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे काम करतात,” असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव? देशाचे पंतप्रधान यांना माझा प्रश्न आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला. डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहारांना चालना मिळाली पाहिजे असा त्यामागचा हेतू होता. पण तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे एवढी मोठी कॅश येते कुठून? असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लिनचीट देऊन मोकळे होतात प्रत्येक गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे काम करतात. समोरच्याला क्लिनचीट देऊन तपास भरकवरट्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सभागृहात हा विषय काढून फार काही हाताला लागेल असे नाही. अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे. हेही वाचा : ट्रम्प पुन्हा भारताला देणार धोका ; ‘या’ उत्पादनांवर नवीन टॅरिफ लादण्याचे दिले संकेत