मी भाजपाला मत दिलं.! मराठी अभिनेत्याने जाहीररित्या सांगूनच टाकलं; आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत

Aaroh Velankar : महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस उजाडला आहे. तब्बल ७ ते ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबईसह राज्यभरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांनी उत्साहात रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे.
निवडणुकीत आपले मत गुपित ठेवण्याचा प्रघात असला, तरी मराठी अभिनेता ‘आरोह वेलणकर‘ याने आपण कोणाला मत दिले, हे जाहीरपणे सोशल मीडियावर सांगितले आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शाई लावलेल्या बोटाचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदान करत मी भाजपाला मत दिलं. प्रगतीसाठी हे मत मी दिलं आहे. तुम्ही मतदान केलं का?” असं त्यानं लिहलं आहे. आरोहच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सोशल मीडियावर सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष :
या २९ महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची मानली जात आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवर आता कोणाची सत्ता येणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आज पार पडलेल्या या मतदानाची मतमोजणी उद्या, १६ जानेवारी रोजी होणार आहे. उद्या दुपारपर्यंत राज्याचा आणि विशेषतः मुंबईचा ‘नवा राजा’ कोण असेल, याचे चित्र स्पष्ट होईल.





