Ball Tampering : भारताच्या विजयाने शेजाऱ्यांना पोटशूळ, पाकच्या खेळाडूचा चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप

Ball Tampering Allegations : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल करत 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत राखली. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांच्या भेदक गोलंदाजीने सामन्याचा निकाल पालटला. मात्र, या विजयानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शब्बीर अहमद खानने भारतीय संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पाचव्या कसोटीत सिराज-कृष्णाची कमाल –
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत एकूण 9 विकेट्स घेतल्या. त्याच्या या अप्रतिम कामगिरीसाठी त्याला सामन्याचा मानकरी म्हणून गौरवण्यात आले. प्रसिध कृष्णानेही दोन्ही डावांत प्रत्येकी 4 विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणले. चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी रिव्हर्स स्विंगचा प्रभावी वापर केला. विशेष म्हणजे, 80 षटकांनंतरही भारताने जुन्या चेंडूने गोलंदाजी सुरू ठेवली, ज्यामुळे रिव्हर्स स्विंग मिळवण्यात यश आले.
पाकिस्तानच्या खेळाडूने काय आरोप केला?
I think
India used Vaseline
After 80 + over
Ball still shine like new
Umpire should send this ball to lab for examine— Shabbir Ahmed Khan (@ShabbirTestCric) August 4, 2025
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शब्बीर अहमद खान याने सोशल मीडियावर भारतावर गंभीर आरोप केला. तो म्हणाला, “80 षटकांनंतरही चेंडू नव्यासारखा चमकत होता. भारताने व्हॅसलीनचा वापर केला असावा. पंचांनी चेंडू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावा.” शब्बीरने पाकिस्तानसाठी 10 कसोटी आणि 32 एकदिवसीय सामने खेळले असून, त्याने कसोटीत 51 आणि एकदिवसीय सामन्यांत 33 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Yash Dayal : राजस्थान उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! यश दयालच्या अटकेला स्थगिती नाही
शब्बीरच्या आरोपांमुळे भारताचा विजय चर्चेचा विषय –
इंग्लंडचा दुसरा डाव भारतीय गोलंदाजांनी उद्ध्वस्त केला. सिराज आणि कृष्णाने इंग्लंडच्या फलंदाजांना सतत त्रास दिला. भारताने हा सामना जिंकत मालिका बरोबरीत आणली. पण शब्बीरच्या आरोपांमुळे हा विजय चर्चेचा विषय ठरला आहे. पंचांनी याबाबत कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही, तरी हा वाद कायम राहण्याची शक्यता आहे. रतीय संघ हा विजय साजरा करत असताना, शब्बीरच्या आरोपांवर क्रिकेट विश्वातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.





